@maharashtracity

पाच दिवसांनी ओपीडी सेवेत डॉक्टर होणार रुजू

मुंबई: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासोबत मध्यवर्ती मार्ड संघटना (MARD) सदस्यांची बैठक झाली. ही चर्चा फलदायी ठरली असून मागण्या पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचे घोषित केले.

पदव्युत्तर परीक्षांचे (counselling for Post Graduation exam) समुपदेशन, नीट पीजी (NEET for PG) प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने, दिल्लीत आंदोलनकर्त्या निवासी डाॅक्टरांना (Resident doctors) पोलिसांनी मारहाण केल्याने डाॅक्टरांच्या विविध संघटनांनी निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. सोमवारी

दरम्यान, पॅन महाराष्ट्र स्ट्राईक मोहिमेतून मध्यवर्ती मार्डने सहभाग घेतला होता. शिवाय राज्यातील निवासी डॉक्टरांच्या काही प्रलंबित मागण्या देखील यात करण्यात आल्या.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यांशी झालेल्या बैठकीत पीजी परीक्षांचे समुपदेशन, नीट पीजी प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब गंभीर घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

तसेच ज्या वैद्यकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांचा स्टायपेंड उशिरा मिळतो तो देण्यात येईल. मात्र नीट पीजी परीक्षांचे समुपदेशन हे नॅशनल मेडिकल कौन्सिलिंग कमिटी ठरवीत असल्याने त्यांच्या सूचनेनंतर सांगण्यात येईल असे सांगण्यात आले. तसेच ऋणानुबंध भत्ता देखील देण्याचे कबूल केले.

त्यामुळे ४ पैकी ३ मागण्यांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरु असल्याने संप मागे घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय सध्या ओमिक्रोनचे रूग्ण वाढत असल्याने मार्ड संघटने कडून संप मागे घेतला असल्याचे घोषित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here