@maharashtracity

मुंबई: फूड ऑन ट्रक पॉलिसीवरून (food on truck policy) आज पालिका सभागृहात विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) व अन्य काही नगरसेवकांनी चांगलाच गदारोळ घातला. यावेळी, पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner I S Chahal) यांच्यावर संताप व्यक्त करण्यात आला. फूड ऑन ट्रक पॉलिसीमध्ये आयुक्त परस्पर बदल करीत असून ते सभागृहाने घेतलेल्या निर्णयाला जुमानत नाहीत, असा आरोप करण्यात आला. (Ruckus over food on truck policy in BMC)

पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, यंदाच्या अर्थसंकल्पात वार्डनिहाय फूड ऑन ट्रक वाटप करण्यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, त्यांच्या वार्डात पालिका निधीतून काही फूड ऑन ट्रकचे वाटपही केले.

वास्तविक, काही नगरसेवकांनी आता निवडणूक तोंडावर आलेली असताना त्यांच्या विभागात फूड ऑन ट्रक वाटप न करता त्याचा निधी अन्य कामांसाठी वळविण्याबाबत पत्र देऊन आयुक्त यांच्याकडे मागणी केली होती.

मात्र, त्याबाबतचा विषय नगरसेवकांनी आज पालिका सभागृहात उपस्थित केला. तर आयुक्त यांनीही फूड ऑन ट्रक पॉलिसीबाबत नवीन नियम लागू करण्याचे सूतोवाच केले.

त्यामुळे नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. फूड ऑन ट्रक पॉलिसीबाबत आयुक्त मनमानी निर्णय घेत असून पालिकेत निवडणूक जिंकून ट्रस्टी बनलेल्या नगरसेवकांना जुमानत नाहीत, त्यांना अपेक्षित निर्णय घेत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.

आयुक्त यांनी स्वतः निवडणूक लढवून नगरसेवक बनावे, असा टोमणा रवी राजा यांनी, आयुक्त यांना लगावला.

तर भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट (BJP spokesperson Bhalchandra Shirsat) यांनी, फूड ऑन ट्रकचे वाटप योग्य व गरजू व्यक्तींनाच करण्यासाठी व त्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी आयुक्तांनी नवीन पॉलिसी तयार करावी, अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here