@maharashtracity

तलाठी- मंडळाधिकारी कार्यालये फोडून लॅपटॉपची चोरी

धुळे: धुळे शहरातील शहरातील पद्मनाभ नगरातही चोरट्यांनी राज्य राखीव पोलिस दलाच्या पोलिसाकडे (SRP) आणि किराणा दुकानदाराकडे धाडसी घरफोडी केली.

तसेच तहसिल कार्यालय परिसरातील तीन तलाठी व दोन मंडळाधिकारी कार्यालयांमध्ये (Talathi office) चोरी करुन चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरुन नेलीत. तसेच तेथील कागदपत्रेही अस्ताव्यस्त केलीत.

एकाच वेळी लागोपाठ पाच कार्यालयांमध्ये चोरी आणि घरफोड्या करुन चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. शिवाय, सरकारी कार्यालयांमधील दोन लॅपटॉप चोरीमागे चोरट्यांचा नेमका काय उद्देश आहे, याची चर्चाही शहरात सुरु आहे.

शनिवारी व रविवार अशी सलग दोन दिवस सुटी आल्याने तहसील कार्यालयासह परिसरातील सर्वच कार्यालये बंद होती. हीच संधी साधत चोरट्यांनी धुळे शहर, मोहाडी, अवधान व महिंदळे विभागाच्या तलाठी व मडळाधिकारी कार्यालयांची कुलपे तोडूली. तेथील कागदपत्रे अस्ताव्यवस्त केली.

तसेच धुळे शहर व मोहाडी अवधानच्या कार्यालयांतून दोन लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केले. सोमवारी सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती कळताच प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार गायत्री सैंदाणे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलिस शोधपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व कार्यालयांची पाहणी करत घटनेची माहिती घेतली.

यावेळी संबंधित तलाठी व मंडलाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, चोरट्यांचा लॅपटॉप चोरीमागे काही महत्वाच्या नोंदी पुसण्याचा इरादा आहे का, आणखी काही महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत का? अशी अनेक प्रश्‍न या चोरीच्या निमीत्ताने उपस्थित होत आहे.

दोन ठिकाणी धरफोडी

जगन्नाथ यादव विसपूते रा. पद्मनाभ नगर यांचे किराणा विक्रीचा व्यवसाय आहे. ते रविवारी रात्री बाहेरगावी गेले होते. यामुळे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी सोमवारी पहाटे विसपूते यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून 15 हजार रूपये रोख, 5 तोळे सोन्याचे दागिने, असा ऐवज चोरून नेला.

तर चोरट्यांकडून घरातील एक कपाट उघडले नसल्याने त्यातील रोकड सुरक्षित राहिली. त्यानंतर चोरट्यांनी शेजारच्या राज्य राखीव पोलिस दलातील वसीम शेख यांचे घर फोडले. वसीम शेख हे जळगाव येथे कार्यरत आहे. ते आणि कुटूंबिय बाहेरगावी गेलेले होते. मात्र, चोरट्यांना शेख यांच्या घरातून काहीही हाती लागले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here