@maharashtracity

रुग्ण संख्या ताण वाढला

मुंबई: राज्यासह मुंबईत रुग्णवाढ सतत होत असल्याने राज्य सरकारची सेंट जाॅर्ज, जीटी, कामा ही तिन्ही रुग्णालये पुन्हा संपूर्ण कोविड समर्पित करण्यात आले असल्याची माहिती जे जे रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय सुरासे यांनी दिली.

दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसऱ्या लाटेत (third wave of corona) देखील रुग्णवाढ होत असल्याने रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे इतर रुग्णसेवेसाठी खुली केलेली रुग्णालये आता पुन्हा कोविड रुग्णांच्या (covid patients) सेवेत रुजू होण्यास सुरवात झाली आहे.

दरम्यान, दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर कोविड समर्पित रुग्णालये (covid hospitals) इतर रुग्णसेवेसाठी खुली करण्यात आली होती. त्यात मुंबईतील (Mumbai) राज्य सरकारची तिन्ही रुग्णालये इतर रुग्णसेवेसाठी खुले करण्यात आली होती. मात्र आता रुग्णसंख्या वाढ तिपटीने सुरु झाल्याने शिवाय त्यात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज वाढल्याने चिंता वाढत आहे. यातून रुग्णसेवेवरील ताण वाढत आहे.

याचा विचार करता राज्य सरकारच्या जे जे रुग्णालये (JJ Hospital) समुहातील जीटी रुग्णालय (GT Hospital) पुन्हा संपूर्ण कोविड रुग्ण सेवेत समर्पित करण्याचा निर्णय आठवडाभरापूर्वी घेण्यात आला. शिवाय तिसऱ्या लाटेत रुग्णांसह डाॅक्टर देखील मोठ्या संख्येने बाधित होत असल्याने जीटी रुग्णालयसह कामा (Cama Hospital), सेंट जॉर्ज रुग्णालये (Saint George Hospital) देखील कोविड समर्पित करण्यात आले.

दरम्यान जीटी हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टर आणि रुग्णही दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. ही रुग्णालये संपूर्ण कोविड सेवेत दाखल करण्याचा निर्णय आठवड्यापूर्वी घेण्यात आला. या रुग्णालयात १६० बेड असून यापैकी बेडवर १०३ बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत.

दरम्यान, दुसऱ्या लाटेत २५० बेडवर रुग्ण व्यापलेले असल्याचे चित्र होते. यावर बोलताना जे जे रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय सुरासे (Dr Sanjay Surase) यांनी सांगितले की, जीटी, सेंट जाॅर्ज आणि कामा रुग्णालये पुन्हा कोविड समर्पित करण्यात आली आहेत. तर जे जे रुग्णालय नाॅन कोविड राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here