@maharashtracity

धुळे: धुळे (Dhule) शहर विधानसभा मतदार संघात ५०% पेक्षा जास्त मुस्लिम अल्पसंख्याक (Muslim minority) आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता विविध स्तरावर फक्त प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार धुळे शहराचे आमदार फारूक शाह (MLA Faruk Shah) यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांची भेट घेऊन अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहाला (Hostel for girls from minority community) मंजुरी मिळवून घेतली. मुलींच्या वस्तीगृहाला शासनाने देवपूर येथे शासकीय जमीन देखील उपलब्ध करून देत यावर होणारा खर्च आदींची तरतुद करून दिली आहे.

शासनाच्या धोरणाप्रमाणे अल्पसंख्यांक समाजासाठी तसेच महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्यांक समाजाची प्रगती व्हावी म्हणून शासन पाऊल उचलत आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा अर्थातच मुला-मुलींचा विकास होऊन त्यांच्या समृद्धीसाठी बाहेरगावी शिकत असतांना वस्तीगृहाच्या रूपाने एक ठिकाण असावे याउद्देशाने आ.फारूक शाह यांनी अल्पसंख्यांक मंत्री मलीक यांच्याकडे तशी मागणी केली.

मंत्री मलिक यांच्या दालनात अल्पसंख्यांक विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, धुळे महानगरपालिका आयुक्त अजीज शेख, मनपा अभियंता कैलास शिंदे यांची आ.शाह यांनी संयुक्त बैठक लावून वसतीगृहाचा प्रश्‍न मार्गी लावला.

त्यात धुळे मतदार संघात अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाला मंजुरी देण्यात आली. यामुळे आता लवकरच धुळे शहरात अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाची एक भव्य इमारतीची निर्मिती होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here