@maharashtracity

महाड (रायगड): महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लाड यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने त्यांना महाड शहर पोलीस (Mahad Police) ठाण्यातून निरोप देण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लाड यांची पोलीस निरीक्षक पदी सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील ओरोस या ठिकाणी पदोन्नती झाल्याने सोमवारी महाड शहर पोलीस ठाण्यात निरोप देण्यात आला. या निरोप समारंभ कार्यक्रमात पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश तांबे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खोपडे यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत लाड यांनी कोणतेही काम मनापासून हातात घेतले तर यश नक्की मिळते असे सांगून आपल्या कामामध्ये अचूकपणा आणि प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला. शिवाय अधिकारी म्हणून कार्यरत असताना लहान मोठेपण न पाहता सर्वांशी मिळून मिसळून राहिले पाहिजे असे सांगितले.

पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश तांबे यांनी लाड यांच्या गेली चाळीस वर्षाच्या कामाच्या अनुभवाची प्रेरणा पोलिसांनी घेतली पाहिजे असे सांगितले. पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश तांबे पोलीस निरीक्षक खोपडे यांनी शाल श्रीफळ देऊन लाड यांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here