@maharashtracity
मुंबई: माटुंगा (पश्चिम) येथे एका हॉटेलवर अचानकपणे झाडाची मोठी फांदी कोसळून झालेल्या दुर्गघटनेत अजित तुळसकर (६४) या वयोवृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, माटुंगा ( पश्चिम), कटारिया मार्ग, मोगल लेन येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास गंगा विहार हॉटेलवर शेजारील एका झाडाची मोठी फांदी अचानकपणे कोसळली. यावेळी, हॉटेलच्या ठिकाणी उपस्थित अजित तुळसकर (६४) ही वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य युद्धपातळीवर हाती घेतले.
हा घटनेनंतर काही नागरिकांनी तात्काळ धावपळ करून गंभीर जखमी अजित तुळसकर यांना बाहेर काढून त्यांना हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.