@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC polls) तोंडावर आलेली असताना सत्ताधारी शिवसेनेकडून (Shiv Sena) विविध विकासकामे यांची उदघाटने व लोकार्पण करण्याची हातघाई सुरू आहे.
महापालिकेच्या ‘जी / उत्तर’ विभागातर्फे दादर चौपाटी (Dadar Chowpaty) येथे उभारण्यात आलेल्या अभिनव व आकर्षक ‘व्ह्युवींग डेक’ चे लोकार्पण राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री व उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी रोजी सकाळी करण्यात येणार आहे.
गेल्याच आठवड्यात, जोगेश्वरी (पश्चिम ) च्या प्रतिक्षानगर येथील मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण, जोगेश्वरी (पूर्व) च्या पूनमनगर येथील मुंबई पब्लिक स्कूलमधील बास्केटबॉल कोर्टचे उद्घघाटन, दादर (पश्चिम) च्या भवानीशंकर रोड येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या डिजिटल क्लासरुमचे (Digital Classroom) उद्घघाटन व वरळी सी फेस येथील मुंबई पब्लिक स्कूलमधील खगोलशास्त्र लॅबचे उद्घघाटन अशी उदघाटने होलसेलमध्ये करण्यात आली.
पालिका निवडणूक आल्याने सत्ताधारी पक्षाने मुंबईत केलेल्या विविध विकासकामांची उदघाटने व लोकार्पण सोहळे झपाट्याने उरकण्याचे काम शिवसेना आपल्या नेत्यांच्यामार्फत करीत आहे.