@maharashtracity

महाड: किल्ले रायगड (Raigad Fort) ते क्रांतिभूमी (Kranti Bhumi) महाड असा समता मार्च १९ मार्च रोजी काढण्यात आला. या मार्चमध्ये विविध जाती धर्मातील नागरिक सामील झाले होते. महाडमधील चवदारतळे (Chavdar tale) येथे या मार्चची सांगता करण्यात आली.

महाडमधील (Mahad) तरुणांनी आयोजित केलेल्या शिवराय ते भीमराय या समता मार्चकरिता मोठ्या संख्येने विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, भीम अनुयायी, स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी, आदी उपस्थित होते. किल्ले रायगडावर छ. शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण करून या मार्चला प्रारंभ झाला.

पाचाड, कोळोसे आदी ठिकाणी या मार्चचे भव्य स्वागत करण्यात आले. हातात तिरंगा घेवून निघालेला हा मार्च जय शिवराय, जय भीमराय अशा घोषणा देत महाडमध्ये दाखल झाला. संपूर्ण महाड शहरातून घोषणा देत हा मार्च चवदारतळे येथे येवून थांबला. या समता मार्चच्या निमित्ताने बोलताना नागेश जाधव यांनी सर्वाना सोबत घेवूनच महाडमधील तरुण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत .छ.शिवाजी महाराज आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांना कोण्या एका समाजाने सीमित करणे योग्य नसल्याचे सांगितले.

“शिवरायांपासून समतेचा सुरू झालेला विचार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आलेला आहे. शिवराय ते भीमराय यांच्या समतेच्या विचारांची आजच्या पिढीला गरज आहे.”

  • शाहीर शीतल साठे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here