@SantoshMasole

जिल्हा बँक निवडणुकीच्या चाव्या अमरिश पटेल, राजवर्धन कदमबांडेंकडेच राहणार!
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सर्व समावेशक शेतकरी पॅनलचे वर्चस्व

धुळे: धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे (Dr Subhash Bhamare) यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे राज्यातील मंत्री आणि नंदूरबारचे पालकमंत्री के सी पाडवी (K C Padvi) यांच्या अक्राणी मतदार संघातून शिवसेनेचे (Shiv Sena) चंद्रकांत रघुवंशी यांनी सेनेच्या दोन सदस्यांना निवडून आणल्याने मंत्री पाडवींनाही हा जोरदार धक्का मानला जात आहे

या जिल्हा बँक निवडणूकित सर्व समावेशक शेतकरी पॅनलचे 13 सदस्य निवडून आले तर किसान संघर्ष पॅनलचे चार सदस्य निवडून आले आहेत.

यामुळे जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा माजी आमदार अमरिश पटेल (Amrish Patel) आणि जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे (Rajwardhan Kadambande) यांचेच वर्चस्व कायम राहीले आहे.

भाजपचे खा. डॉ. सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील यांचा महाविकास आघाडीचे (MVA) प्रा.शरद पाटील (Prof Sharad Patil) यांनी पराभव केल्याने डॉ भामरे यांना हा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे माजी आमदार असलेले प्रा शरद पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस प्रवेश करून घर वापसी केली आहे.

जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी रविवारी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 17 केंद्रांत 98 टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी शहरातील पारस मंगल कार्यालयात मतमोजणी होऊन अकरा वाजता निकाल जाहीर झाला.

यात सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलतर्फे राजवर्धन कदमबांडे, हर्षवर्धन दहिते, राजेंद्र देसले, अमरसिंग गावीत, शिला विजय पाटील, सीमा तुषार रंधे, दर्यावगिर महंत यांचा विजय झाला.

तर किसान संघर्ष पॅनलमधून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार प्रा.शरद पाटील व संदीप वळवी यांचा विजय झाला आहे.

दरम्यान, महिला मतदारसंघातून भाजपाचे अनिकेत विजय पाटील यांच्या मातोश्री शीला विजय पाटील या सर्वांधिक 758 मतांनी निवडून आल्या आहेत. विजयाबद्दल त्यांचे पती माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला.

कृषी पणन संघाच्या जागेतून राजवर्धन कदमबांडे हे 131 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी अंकुश विक्रम पाटील यांचा पराभव केला. विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय सदस्यांमधून महंत दर्यावगीर दौलतगिर हे 694 मते मिळवून विजयी झाले. तर त्यांच्याविरोधातील सुरेश फकीरा शिंत्रे यांचा 243 मते मिळून परावभ झाला.

प्रा.शरद पाटील यांनी 120 मते मिळवून सुरेश रामराव पाटील यांचा पराभव केला. सुरेश पाटील यांना केवळ 77 मते मिळाली. महिला मतदार संघातून शिलाताई विजय पाटील या सर्वांधिक 758 मतांनी निवडून आल्या.

सीमा तुषार रंधे या देखील 745 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. हिरकणबाई बाबुराव पाटील यांना 200 मते मिळाली असून त्याचा पराभव झाला आहे.

तर किसान संघर्ष पॅनलचे नंदुरबार तालुक्यातून चंद्रकांत रघुवंशी हे 59 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी पावबा माधवराव धनगर यांचा पराभव केला आहे. धनगर यांना केवळ 8 मतांवर समाधान मानावे लागले आहे.

तसेच अक्राणी महलमधून संदीप मोहन वळवी यांना दहा मते मिळवून विलास पुनाजी पाडवी यांचा पराभव केला आहे. पाडवी यांना केवळ 6 मते मिळाली आहे. साक्री तालुक्यातून हर्षवर्धन शिवाजीराव दहिते यांनी 52 मते मिळवित विजय मिळविला. त्यांनी अक्षय पोपटराव सोनवणे यांचा पराभव केला. सोनवणे यांना 25 मते मिळाली.

नवापूर तालुक्यातून अमरसिंग हुरजी गावित यांनी 13 मते मिळवित अभिमन फुलसिंग वसावे याचा पराभव केला. वसावे यांना अवघी 4 मते मिळाली. तसेच शिंदखेडा तालुक्यातून राजेंद्र शामराव देसले हे 62 मते मिळवित विजय झाले. त्यांनी संध्याबाई जयवंतराव बोरसे यांचा पराभव केला. बोरसे यांना 44 मते मिळाली आहेत.

बिनविरोध निवडलेले सदस्य असे ः

बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. भगवान विनायक पाटील (धुळे तालुका), प्रभाकर चव्हाण (शिरपूर तालुका), दीपक पुरुषोत्तम पाटील (शहादा तालुका), आमशा फुलजी पाडवी (अक्कलकुवा तालुका), भरत बबनराव माळी (तळोदा तालुका), शिरीष नाईक, शामकांत सनेर यांचा समावेश आहे.

“राजवर्धन कदमबांडे यांच्यासह सर्वच संचालकांनी चांगल्या प्रकारे बँकेचा कारभार चालविला. त्यांनी चुकीचे कर्ज दिले नाही. त्यांनी स्वबळावर अर्थपुरवठा केला आहे. शेतकर्‍यांचा विचार करुन जे पॅनल उभे केले होते त्याला चांगले यश मिळाले. सर्व पक्षांना व काँग्रेसलाही आम्ही बरोबर घेतले होते. सर्वांनी एकमताने पॅनल देऊन हे यश मिळविले आहे. पुढील अध्यक्ष पुन्हा कदमबांडेंनाच करण्याचा विचार आहे.”

  • अमरिश पटेल, विधान परिषद सदस्य, भाजप

नवनिर्वाचित संचालक – 2021

*सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल =13

1) राजवर्धन कदमबांडे (निवड)

2) दिपक पाटील (बिनविरोध)

3) भरत माळी (बिनविरोध)

4) शिरीष नाईक (बिनविरोध)

5) शीलाताई विजय पाटील (निवड)

6) सिमा तुषार रंधे (निवड)

7) प्रभाकरराव चव्हाण (बिनविरोध)

8) राजेंद्र देसले (निवड)

9) हर्षवर्धन दहिते (निवड)

10) मंहत दर्यावगीर (निवड)

11) शामकांत सनेर (बिनविरोध)

12) भगवान पाटील (बिनविरोध)

13) अमरसिंग गावीत (निवड)

किसान संघर्ष चॅनल- 4

1) चंद्रकांत रघुवंशी (निवड)

2) शरद पाटील सर (निवड)

3) आमशा पाडवी (बिनविरोध)

4) संदिप वळवी (निवड)

Previous article…अखेर रखडलेल्या माहुल पंपिंग स्टेशनसाठी खासगी भूखंड
Next articleमुंबईला साथरोगाच्या रुग्णात वाढ
सन १९९१-९२ पासून 'अविरोध' या जिल्हा वृत्तपत्रातून पत्रकारितेचे धडे घेतले. १९९३ पासून 'आपला महाराष्ट्र' या जिल्हा दैनिकात प्रत्यक्ष वार्तांकनाला सुरुवात. देशदूत, सकाळ, गावकरी, लोकसत्ता, दिव्य मराठी या वृत्तपत्रांतून विविध ज्वलंत प्रश्नांवर लेखन. साप्ताहिक 'चित्रलेखा'तून लेखन, आकाशवाणी धुळे केंद्रावरून क्रीडा आणि ताज्या घटनांचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमांचे सादरीकरण आणि प्रक्षेपण, "लोकवृत्त"या धुळे जिल्ह्यातल्या अल्प काळात प्रशासन प्रिय झालेल्या जिल्हा वृत्त वाहिनीचे संस्थापक संचालक. वृत्तपत्रांतून सहकारातील दूध संघांची वाताहात, आदिवासी दुर्गम भागातून होणारी सागवानी लाकडाची तस्करी, परिवहन महामंडळातील प्रशासकीय अंदाधुंदी, न्यायालयीन कामकाज आणि कायदा सुव्यवस्थेतील प्रासंगिक स्थिती यावर परखड भाष्य अशा विविध विषयांवर प्रकाशझोत. सहकारातील भ्रष्ट कारभार पुराव्यासह चव्हाट्यावर आणण्याचे प्रयत्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here