राज्यात ८९३ तर मुंबईत ८९ बाधित
@maharashtracity
मुंबई
राज्यात शनिवारी ८ अशी एक अंकी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. तसेच आज राज्यात ८९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना लबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६४,५१६ झाली आहे. आज १,७६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,०९,०१५ कोरोना लबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ७,८११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७७,४४,५७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६४,५१६ (१०.१२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,४०,९४२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत ८९ बाधित
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८९ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५५३७८ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६९१ एवढी झाली आहे.