@maharashtracity

आढावा घेऊन परवानगीची शक्यता

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: दिवाळीनंतर रुग्णसंख्येच्या वाढण्या-कमी होण्याच्या मुद्यावर तज्ज्ञांशी बैठक घेवून दिवाळीनंतर एका डोसवर मुक्त संचार सुरु करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) निर्णय घेतील, अशी शक्यता रविवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी वर्तवली आहे. यामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे. (State may allow people who has taken single dose of vaccine)

लसीचा दुसरा डोस घेतल्याशिवाय रेल्वेप्रवास नाही, तर माॅलमध्येही प्रवेश नाही, तसेच कोव्हीशिल्ड (covishield) दोन डोसमधील मोठ्या कालावधीचे अंतर हे सर्व सर्वसामान्यांसाठी असुविधा निर्माण करत आहे. या सर्वाचा विचार करुन हा निर्णय घेण्यात येणार आहे.

पुढे बोलताना टोपे यांनी सांगितले की, नुकताच दसरा झाला असून दिवाळी तोंडावर आली आहे. लोक बऱ्यापैकी घराबोहर पडत आहेत. याच काळात रुग्णसंख्येवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. मात्र संख्या का वाढत आहे तसेच किती पर्यंत वाढेल याचा अंदाज घेण्यात येत आहे.

या सर्वाचा विचार करुन काही सवलतीसुध्दा वाढवता येतील का याची चाचपणी सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली. दरम्यान, या सर्वांवर राज्य कोराना टास्क फोर्स (corona task force) आणि आरोग्य विभागासोबत चर्चा करुन सवलतीचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर घेण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

तसेच लसीचा एक डोस घेतल्यास रेल्वे प्रवासाला तसेच मॉलमध्ये जाण्यास परवानगी नाही. जर संख्या आटोक्यात राहिली तर यावर काही सवलत देता येऊ शकेल का यावर विचार सुरु आहे.

सेतू ऍप मध्ये सेफ असे स्टेटस असल्यास सवलत देण्यास विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले. शिवाय दिवाळीनंतर रुग्णसंख्येच्या पाॅजिटीव्ह संख्येवर आरोग्य विभागासोबत चर्चा करुन हा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर हर्ड इम्युनिटी (herd immunity) आली आहे का या मुद्याचा तज्ज्ञांशी चर्चा करुन त्यांचे मत घेण्यात येणार आहे. शिवाय सध्या कोव्हिशिल्ड लसीच्या डोसमधील अंतर ८४ दिवसांचे असून हा कालावधी मोठा असल्याने लोकांना असुविधा होत आहे. त्यामुळे आरोग्याची बाब म्हणून प्राधान्याने लक्षात घेऊन निर्णय होण्याची शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here