@maharashtracity

मुंबई: राज्यात गुरुवारी ४६,४०६ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७०,८१,०६७ झाली आहे.

आज ३४,६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६६,८३,७६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३९% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,५१,८२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात गुरुवारी ३६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,१३,५९,५३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७०,८१,०६७ (९.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १७,९५,६३१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर ९१२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण (omicron patient) आढळलेला नाही.

मुंबईत १३७०२ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १३७०२ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण ९६७९३९ रुग्ण आढळले. तसेच ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६४२६ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here