Twitter: @maharashtracity

मुंबई: कोविड काळातील (covid pandemic) रुग्णसेवेसाठी काही परिचारिकांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले होते. कोविड संपल्यानंतर त्यांना सेवेतून दूर करण्यात आले होते. मात्र, अशा ५९७ परिचारिकांना कायमस्वरुपी कामावर घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या परिचारिकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाची लढाई (war against corona) आरोग्य सेवेतील तसेच फ्रंटलाईन वर्कर्स (frontline workers) यामुळे जिंकण्यात आली. कोरोनात वैद्यकीय क्षेत्रातील परिचारिकांनी तर जीवाची बाजी पणास लावली होती. वाढती रुग्णसंख्या पाहता कंत्राटी पद्धतीने काही परिचारिकांची भरती करण्यात आली होती. अशा कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ५९७ परिचारिकांना (contractual nurses) कायम करण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. या परिचारिकांना कायमस्वरुपी सरकारी सेवेत समाविष्ट करण्यात येणार आहे. 

दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात या परिचारिकांसोबत ११ महिन्यांचा करार करण्यात आला होता. त्या कराराप्रमाणे या परिचारिका काम करत होत्या. मात्र, तो करार संपल्यावर सर्व परिचारिकांना घरी जावे लागणार होते. या मुद्यावर राज्य सरकारने पुढाकार घेत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला. त्यातूनच या परिचारिकांना कायमस्वरूपी सरकारी सेवेत रुजू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here