@maharashtracity

मुंबईत दिवसभरात ६ हजार ११५ लसीकरण

मुंबई: मुंबईत सोमवारपासून सुरु झालेल्या १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला जल्लोषात सुरुवात झाली. सकाळी ९ वाजल्यापासून मुंबईतील विविध मुलांच्या लसीकरण केंद्रांवर (vaccination centers) प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले.

यावेळेस लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकाला लसीकरण करण्याचे आवाहन केले. शहर उपनगरात दिवसभरात ६ हजार ११५ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

मुंबईत सोमवारी पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ४ हजार ८०६, शासकीय लसीकरण केंद्रावर १४८, खासगी लसीकरण केंद्रांवर १ हजार १६१ लाभार्थ्यांचे लसीकऱण करण्यात आले. दरम्यान, मुंबईत पुढील २८ दिवसात लसीकरण पूर्ण करण्याचा मानस असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भायखळा : ४३२ मुलांनी घेतली लस

भायखळा (इ विभाग) येथील रीचर्डसन क्रूडास जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या दिवशी एकूण ४३२ मुलांनी लस घेतली. यामध्ये महानगरपालिका शाळेतील ६७ विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.

यावेळी कोविड केंद्रात स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव, प्रभाग समितीचे अध्यक्ष रमाकांत रहाटे, स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर, सुरेखा लोखंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हे लसीकरण केंद्र सहआयुक्त (परिमंडळ १) रणजित ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील ई विभाग कार्यालयामार्फत उभारण्यात आले आहे.

सोमवारी झालेले लसीकऱण : ६७५४८
पहिला डोस : १९६२८
दुसरा डोस : ४७९२०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here