@maharashtracity

बॉम्बे हॉस्पिटल एकमेव खासगी हॉस्पिटल

मुंबई: ओमिक्रॉनच्या प्रसार अटकावासाठी पालिकेने जय्यत तयारी सुरु केली आहे. यात ओमिक्रॉनच्या संशयितांसाठी १८ ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यात बॉम्बे हॉस्पिटल एकमेव खासगी हॉस्पिटल असल्याची देखील माहिती मिळत आहे.

ओमिक्रॉन वेरियंटच्या (Omicron variants) पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या तपासण्या बहुतांश परदेशी प्रवाशांच्या करण्यात येत आहेत. यात कोविड पॉझिटिव्ह (covid) असल्यास त्याला संस्थात्मक अलगीकरण (Institutional quarantine) आणि उपचार असे दिले जात आहे.

या संस्थात्मक अलगीकरणासाठी १८ रुग्णालये ठरविण्यात आली आहेत. ही १८ केंद्र मुंबईतील आहेत. यात बॉम्बे हॉस्पीटल (Bombay Hospital) हे एकमेव खासगी हॉस्पिटल आहे. दरम्यान, राज्य कोविड टास्क फोर्सच्या ( Covid Force) तज्ज्ञांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष क्रेंद्रीत करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

तसेच सध्या आढळणारे कोविड पॉझिटिव्ह हे संशयितांमध्ये मोडत असले तरी एखाद्या वेरियंटची लाट येण्यास किमान दोन महिन्याचा अवधी लागत असल्याचे टास्क फोर्स सदस्य सांगत आहेत. या दोन महिन्याच्या कालावधीत रुग्णसंख्येवर ओमिक्रॉनची लाट ठरवता येईल असा ही अंदाज एका सदस्याने व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here