भाजयूमोची पोलीस प्रशासनाकडे मागणी
@maharashtracity
धुळे: शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंदू बांधवांना चिथावणी देणारे व्हिडीओ चित्रण समाज माध्यमांवर प्रसारीत करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजयुमोच्या पदाधिकार्यांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत भाजयुमोने दिलेल्या निवेदनानुसार, शहरात शिवजयंतीनिमित्त नवीन महापालिकेजवळ लावलेल्या फलकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई झाली व ते तातडीने काढण्यात आले होते. या प्रकारानंतर हिंदू धर्मियांनी सामंजस्य दाखवत शांतता कायम राखली. परंतु, याच कारवाईचे भांडवल करत एका विकृताने हिंदू समाजाला डिवचण्याचा खोडसाळ प्रकार केला. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल तर केला परंतु ज्यांनी हा व्हिडिओ हिंदू बांधवांमध्ये जागृती व्हावी यासाठी समाजमाध्यमावर प्रसारीत केला होता, अशा लोकंवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
निर्मिती व जनजागृती हे दोन वेगवेगळे विषय असून त्यांना वेगवेगवेगळ्या प्रकारे गृहीत धरून कारवाई व्हावी. सरसकट सर्वाविरुध्द कारवाई करु नये, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा धुळे महानगरतर्फे भाजयुमो जिल्हाध्यक्ष अॅड.रोहित चांदोडे, सचिन पाटील, मकरंद अंपळकर, उपाध्यक्ष पंकज धात्रक, विक्की सोनार, महेश निकम, राहुल मराठे, आतिष चौधरी, हर्षल बोरसे आदींनी केली आहे.