@maharashtracity

धुळे तालुक्यासाठी 29 कोटी 21 लक्ष रु.मंजुर

धुळे: सप्टेंबर 2021मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 29 कोटी 21 लक्ष 80 हजार रुपये वाटप करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. नुकसान भरपाईचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होतील, अशी माहीती काँग्रेसचे आ. कुणाल पाटील (Congress MLA Kunal Patil) यांनी दिली.

धुळे (Dhule) जिल्ह्यासह धुळे तालुक्यात 5 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2021 रोजी अतिवृष्टी (heavy rainfall) झाली होती. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे (crop loss of farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची भेट घेवून आ.पाटील यांनी मदतीची मागणीही केली.

त्यानुसार धुळे तालुक्यातील एकूण 47 हजार 227 शेतकऱ्यांना 29 कोटी 21 लक्ष 80 हजार रुपये मदत निधी प्राप्त झाला आहे. हा निधी बाधित शेतकऱ्यांना तत्काळ वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित यंत्रणेला दिल्या असल्याची माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here