@maharashtracity

राज्य कोरोना टास्क फोर्सची सूचना

मुंबई: राज्यातील शाळा खुल्या (reopening of school) करण्याचा निर्णय सप्टेंबरपर्यंत घेऊ नयेत. ५० टक्के विद्यार्थी संख्येने खुली करावयाची असल्यास सप्टेंबरनंतर करावी, असे स्पष्ट संकेत कोविड राज्य टास्क फोर्सकडून (covid task force) देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवपर्यंत (Ganesh festival) तरी सध्या सुरु असलेले वर्ग ऑनलाईन (online classroom) पद्धतीने सुरु राहतील, अशी शक्यता आहे.

कोरोनाच्या (corona) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक (Dr Sanjay Oak) यांनी ही सूचना केली. बालरोग टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनीही या सूचनेला पाठिंबा दिला आहे.

कोरोनाच्या निर्बंधांवर मनसेचे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शाळा सुरू करण्यासाठी वर्गातील मुलांचे दोन गट करून आठवड्यातून प्रत्येकी दोन दिवस शाळा सुरू करता येईल का असा प्रश्न टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांना विचारला होता. त्यावर डॉ. ओक यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (CS Sitaram Kunte) यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची शिक्षण समितीसोबत १० ऑगस्ट रोजी चर्चा झाली. या बैठकीत सप्टेंबरअखेरपर्यंत शाळा सुरू करू नयेत, तसेच ५० टक्के विद्यार्थी संख्येचा प्रयोग सप्टेंबरनंतर करता येईल, असे स्पष्ट केले आहे.

सध्या कोरोनावरील उपचार यावरच लक्ष केंद्रित असून शाळा, व्यापार, उदीम यावरील परिणामांचा विचार केला जात नाही. त्यामुळे टास्क फोर्समध्ये अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, माहिती विश्लेषक, शिक्षणतज्ज्ञ यांचाही समावेश करणे आवश्यक असल्याचे मनसेच्या देशपांडे यांनी सुचविले. मात्र टास्क फोर्सच्या आठवडा बैठकीत देश-विदेशातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ उपस्थित राहत असून त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले. हे निर्णय राज्याचे मुख्य सचिव व आरोग्य सचिवांना पाठवून तदनंतर सूचना देण्यात येतात.

तसेच कोरोनाच्या माहितीचे रोज विश्लेषण करून लाॅकडाउनचा निर्णय अपरिहार्य ठरला, तर राज्यातील (३० हजार खाटा आणि ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन) ऑक्सिजनच्या निकषावर सरकारी यंत्रणा पातळीवर केला जाईल असे ही डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here