@maharashtracity
राज्यात २८,२८६ नवीन रुग्णांची नोंद
मुंबई: राज्यात सोमवारी २८,२८६ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. रविवारी ४०,८०५ एवढ्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे ही घट आतापर्यंत झालेल्या २४ तासातील सर्वात मोठी घट असल्याचे दिसून येत आहे.
आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७५,३५,५११ झाली आहे. काल २१,९४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७०,८९,९३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०९% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,९९,६०४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात सोमवारी ३६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८% एवढा आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३५,११,८६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७५,३५,५११ (१०.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,३५,१४१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,४०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत १८५७ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १८५७ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,३५,७७२ रुग्ण आढळले. तसेच ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एण मृत्यूची संख्या १६५४६ एवढी झाली आहे.
राज्यात ८६ नोंद
राज्यात सोमवारी ८६ ओमीक्रॉन संसर्ग (Omicron patients) असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान (NIV) संस्थेने रिपोर्ट केले आहेत. ८६ ओमीक्रॉन रुग्णात नागपूर ४७, पुणे मनपा २८, पिंपरी चिंचवड मनपा ३, वर्धा २, तर मुंबई, अमरावती, यवतमाळ, भंडारा, ठाणे मनपा आणि पुणे ग्रामीण प्रत्येकी १ असल्याचे सांगण्यात आले.
आजपर्यंत राज्यात एकूण २८४५ ओमीक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले. यापैकी १४५४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR Test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ६३२८ नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६२२३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १०५ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.