@maharashtracity

जानेवारीत पाच अवयवदान

मुंबई: नव्या वर्षातील पहिला महिना अवयवदान (organ donation) चळवळीला प्रेरक ठरला असून जानेवारी महिन्यात पाच अवयवदान झाले. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चार अवयवदान झाल्याने अवयवदानाला प्रेरणा मिळाली असल्याचे मुंबई झोनल ट्रान्सप्लान्ट कोओर्डीनेशन कमिटीचे अध्यक्ष डॉ एस माथुर (Dr S Mathur) यांनी संगीतले.

कोरोना महामारीच्या (corona pandemic) दोन लाटात अवयवदान चळवळ थबकल्यासारखी झाली होती. २०२० या वर्षात ३० तर २०२१ या वर्षात ३३ अवयदान झाले होते. मात्र कोरोनाची तिसरी लाट कमी होत असताना वर्षाच्या पहिल्या महिन्यात पाच अवयवदान करण्यात आले.

४७ वर्षे ते ७७ वयोगटातील अवयवदात्यांनी अवयवदान केले. यात विशेष म्हणजे पाचही अवयवदात्यांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी पुढाकार घेतला. या पाच अवयवदानात यकृत दानाची (lever donation) संख्या सर्वाधिक नोंदविण्यात आली. तर त्या खालोखाल ३ मूत्रपिंड (kidney) प्रत्यारोपित करण्यात आली. तर हृदय (heart) आणि नेत्रदानामुळेही (eyes) दोघांना जीवनदान मिळाले. एकूण अवयवातील एक फुफ्फुस (lungs) आणि हृदय प्रत्यारोपणासाठी अयोग्य ठरल्याने त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here