@maharashtracity

आव्हानात्मक सात प्रकारची यकृत प्रत्यारोपण ही पश्चिम भारतात प्रथमच

मुंबई: मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये (Global Hospital) यकृत प्रत्यारोपणात नवीन रेकॉर्ड केला आहे. या हॉस्पिटलमध्ये ५०० हून अधिक यकृत प्रत्यारोपण (Lever Transplant) करण्यात आले असून यात सात प्रकारचे प्रत्यारोपण ही आव्हानात्मक होते. असे प्रत्यारोपण पश्चिम भारतात पहिल्यांदाच करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यात प्रामुख्याने सर्वात कमी वजनाच्या बाळाच्या शरिरात यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. हे बाळ ४.७ किलोचे होते. तर एबीओ यकृत प्रत्यारोपण, तसेच यकृत आणि किडनीचे एकाचवेळी प्रत्यारोपण, यकृताचे अदलाबदली प्रत्यारोपण, दुहेरी लोब यकृत प्रत्यारोपण हे यकृत प्रत्यारोपणाचे प्रकार पश्चिम भारतात पहिल्यांदाच ग्लोबल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले असल्याचे ग्लोबल हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Also Read: परिचारिकांचे काळ्या फिती लावून आंदोलन

अशा गुंतागुंतीच्या प्रत्यारोपणासह मिळून पाचशे हून अधिक प्रत्यारोपण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here