@maharashtracity
आठवड्यात तीन वेळा साडे तीन हजाराच्या सरसरीत
मुंबई: राज्यात रविवारी ३,६२३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या ६ सप्टेंबरपासून तीन वेळा राज्यातील कोरोना रूग्ण (corona patients) संख्या साडे तीन हजाराच्या सरसरीत नोंद झाली.
दिनांक ६, ७ आणि ११ सप्टेंबर रोजी साडे तीन हजाराच्या सरसरीत नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,९७,८७७ झाली आहे. आज २,९७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०५,७८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५०,४०० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात रविवारी ४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५९,७९,८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९७,८७७ (११.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २,९८,२०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत दिवसभरात ३५७:
मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३५०५५ एवढी झाली आहे. तर ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६०२२ मृत्यूची नोंद करण्यात आली.