@maharashtracity

मुंबईत आतापर्यंत ९७ टक्के रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई: मुंबईत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या (active corona patients) तुलनेत एकूण 8 टक्के गंभीर रुग्ण आहेत. म्हणजेच गंभीर रुग्णांची संख्या दुपटीने उतरली असून एकूण रुग्णांपैकी फक्त 1 टक्के गंभीर असल्याचे पालिकेचा डॅशबोर्ड सांगत आहे. तर आतापर्यंत ९७ टक्के मुंबईकरांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती 22 सप्टेंबरपर्यंतचा डॅशबोर्ड सांगते. ९७ टक्के म्हणजे ७ लाख १६ हजार ११६ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज करण्यात आले.

दरम्यान, गेल्या एका महिन्याच्या तुलनेत कोरोनाचे लक्षण असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे हे चाचण्यांतून दिसून येते. शनिवारी मुंबईत 40911 चाचण्यामधून 454 कोरोनाबाधित आढळले. एवढ्या मोठ्या संख्येच्या चाचण्यांमधून बाधितांमध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे समोर आले आहे.

सध्या मुंबईत रोज 500 च्या दरम्यान कोविड- 19 चे रुग्ण सापडत आहेत. 4,706 सक्रिय प्रकरणांपैकी 375 म्हणजेच जवळपास 8% रुग्णांची गंभीर परिस्थिती सध्या पालिकेच्या आकडेवारीनुसार आहे. तर, सक्रिय रुग्णांपैकी 43 टक्के रुग्ण लक्षण नसलेले आहेत.

दिनांक 22 ऑगस्ट रोजी मुंबईत गंभीर रूग्णांची संख्या एकूण 444 एवढी होती. तर, 2,825 सक्रिय रुग्ण होते. मात्र, आता सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली असून 4,706 सक्रिय रुग्ण झाले आहेत.

मुंबईची आतापर्यंतची एकूण आकडेवारी :
एकूण चाचणी- 1,01,77,774
एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण – 7,40,761
एकूण मृत्यू- 16,079
पूर्णपणे बरे – 7,17,521
दुप्पट दर – 1195 दिवस
चाळ / झोपडपट्टी सील – 1
बिल्डिंग सील- 53

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here