@maharashtracity

राजस्थान, गुजरातच्या काही भागातून घेतली माघार

आगामी ३ ते ४ दिवस राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता

मुंबई: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी म्हणजेच मान्सूनने वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली असल्याचे आज भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

बुधवारी ६ सप्टेंबर रोजी मान्सूनची रेघ राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून परतल्याची हवामान विभागाने जाहीर केले आहे. यंदा तब्बल १९ दिवस उशीराने मान्सूनने वारे माघारी फिरले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता असून आगामी ३ ते ४ दिवस राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. (Heavy rain expected in part of Maharashtra).

दरम्यान, सद्य हवामान स्थिती पाहता राज्यातून १४ ते १५ ऑक्टोबर दरम्यान मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग येईल, असेही सांगण्यात आले. बुधवारी सायंकाळी मुंबईत किरकोळ ठिकाणी गडगडाटासह पाऊस झाला.

मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण असून दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. यंदा १३ जुलै रोजी राजस्थानसह (Rajasthan) संपुर्ण भारत व्यापलेल्या वाऱ्यांनी सुमारे दोन महिने २४ दिवस या भागात मुक्काम केल्यानंतर माघारीची वाट धरली आहे.

हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे. पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरातमध्ये (Gujarat) पावसाने उघडीप दिली असून, आर्द्रतेती टक्केवारी चांगलीच कमी झाली आहे.

तसेच या भागात वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) (anti cyclone) तयार झाल्याने मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

बुधवारी (ता. ६) पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. बिकानेर, जोधपूर, जालोर आणि भूजपर्यंत भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान आहे.

पुढील तीन ते चार दिवसांत राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश संपुर्ण भाग, गुजरातचा आणखी काही भाग, मध्य प्रदेशच्या काही भागातून मॉन्सून वारे परतण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here