@maharashtracity

४३ कोटींचा खर्च करणार

मुंबई: मुंबई शहर व उपनगरे येथील अनेक पदपथ (footpath) नागरिकांना चालण्या योग्य राहिलेले नाहीत. अनेक पदपथांची अवस्था बिकट झालेली आहे. राज्याचे पर्यावरण, पर्यटन व पालकमंत्री आदित्य ठाकरे (Guardian Minister Aaditya Thackeray) यांच्या आदेशाने चेंबूर, महर्षी दयानंद सरस्वती मार्ग, चेंबूर स्टेशन ते डायमंड ग्राउंड आणि वडाळा येथील लेडी जहांगीर रोड, सेंट जोसेफ सर्कल , वडाळा स्टेशन ते रुईया महाविद्यालय या पदपथांचे सुशोभीकरण व सुधारणा करण्याचे काम करण्यात येणार आहे.

हे काम पूर्ण झाल्यावर पादचाऱ्यांना चांगले पदपथ चालण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

या कामासाठी पालिका ४३ कोटी ५५ लाख रुपये खर्च करणार आहे. या पदपथाचे काम प्रस्ताव मंजूर झाल्यावर व कार्यादेश प्राप्त झाल्यावर किमान १५ महिन्यांत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे काम २३.२१% एवढ्या कमी दरात करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत विरोधकांकडून व पहारेकरी भाजपकडून (BJP) शंका उपस्थित केली जाऊ शकते.

तसेच, कंत्राटदाराने २३.२१% कमी दरात हे काम करण्याची तयारी दर्शवल्यानेमुळे कंत्राट रक्कम ४३.५५ कोटींपर्यंत कमी झाली आहे. अन्यथा या रकमेत आणखीन काही कोटी वाढ झाली असती.

या कामासाठी पालिकेने जेव्हा टेंडर मागवले त्यावेळी १४ कंत्राटदारांनी कंत्राट मिळविण्याबाबत तयारी दर्शवत टेंडर प्रक्रियेत भाग घेतला होता. मात्र मे. पियुष एन्टरप्रायजेस या कंत्राटदाराने २३.२१% कमी दरात म्हणजे ३२ कोटी ४ लाख १हजार २८२ एवढ्या किमतीत अधिक इतर खर्च असे एकूण ४३ कोटी ५५ लाख रुपये दरात हे काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here