@maharashtracity

व्यापक जनजागृकतेचा फायदा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती

मुंबई: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि आवाज फाऊंडेशनकडून (Awaaz Foundation) १५ पकारचे नियमित फटाके तर १५ प्रकारचे ग्रीन फटाके अशा एकूण ३० प्रकारच्या फटाक्यांची चाचणी गुरुवारी आरसीएफ मैदानात घेण्यात आली. यावेळी देखील आवाजाची पातळी कमी असल्याचे नोंद झाली आहे. (Less noise pollution expected in this diwali)

गेल्या पाच वर्षात जनजागृतीमुळे मुंबईतील फटाक्यांचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाऊंडेशनकडून २००४ पासून फटाक्यांच्या आवाजाची पातळी तपासली जाते. सुरुवातीच्या वर्षांमध्ये फटाक्यांचे आवाज परवानगी दिलेल्या मर्यादा ओलांडत होती. तर २०१० या वर्षी १३०.६ डेसिबल एवढी उच्च पातळी ओलांडली असल्याची नोंद करण्यता आली.

ही नोंद जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे १२५ डेसिबलहून अधिक होती. मात्र त्यापुढील वर्षात फटाक्यांच्या आवाजाची पातळी कमी नोंद गेली असल्याचे सांगण्यात आले.

नोंदीतील उपलब्ध माहितीनुसार फटाक्यांचा आवाज कमी होत चालला आहे. सन २०२० पासून तर सरकारने ग्रीन फटाक्यांना (Green crackers) परवानगी दिली. हे ग्रीन फटाके निरी (NIRI) सस्थेने विकसित केले असून आवाज आणि हवेतील प्रदुषण कमी करणारी आहेत. त्यावर तशी माहिती असते.

अद्याप सरकारकडून कोणतीही घोषणा केली नसली तरीही ग्रीन फटाक्यांसह सर्व प्रकारचे फटाके बाजारात उपलब्ध असल्याचे आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली (Sumaira Abdulali) यांनी सांगितले.

दरम्यान, कोविड निर्बंधात शिथिलता येत असून तसेच दिवाळी तोंडावर आल्याने आवाज करणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळे आवाज करणाऱ्या फटाक्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष ठेऊन आहे.

दिवाळी उत्सवात फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दिपावली साजरी केली जावी, याकरीता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गेल्या काही वर्षापासून व्यापक जनजागृती केली जात आहे. त्याचा दृष्य परिणाम दिसू लागला असून दरवर्षी फटाके वाजविण्याच्या प्रमाणात घट दिसून येत आहे.

त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. फटाक्यांच्या विक्रीबाबत नवे निर्देश जारी होण्याची शक्यता असल्याचे वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here