@maharashtracity

मुंबई: कोविड-19 लसीकरणात (covid-19 vaccination) मंगळवारी राज्याने 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटीचा टप्पा ओलांडला. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या यशाचे श्रेय राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले. (Maha administeres 10 crore vaccination)

मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 4,07,875 पात्र लाभार्थींना कोरोना विरूद्ध लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व नागरिकांना किमान पहिला डोस मिळावा, असे निर्देश दिले होते.

दरम्यान, आतापर्यंत राज्यातील 6,80,28,164 लोकांना पहिला डोस मिळाला आहे. तर 3,20,37,073 लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 10,00,65,237 लसीकरण करण्यात आले आहे.

या कामगिरीबद्दल राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित (Dr Rahul Pandit of Task Force) यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात भारताने 100 कोटी डोसचे लक्ष पूर्ण केले, तेव्हा हा अभिमानाचा क्षण होता. आज नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, महाराष्ट्राने पात्र लाभार्थ्यांना 10 कोटी लसीचे डोस पूर्ण केले आहेत.

हा एक महत्त्वाचा टप्पा असून राज्याने 6.8 कोटी लोकांना पहिला डोस यशस्वीपणे दिला आहे. तर 3.2 कोटी लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण केले आहे. हे यश राज्य आणि पालिका अधिकारी, प्रशासकीय संस्था, आरोग्यसेवा कर्मचारी, आणि जबाबदार नागरिकांच्या प्रचंड मेहनतीचे, धोरणात्मक कौशल्याचे फळ आहे.

सावधगिरी आणि कोविड-19 योग्य वर्तन न ठेवल्यास, प्रकरणे पुन्हा वाढतील. ख्रिसमस, नवीन वर्ष यासारखे सण लवकरच येत आहेत. सतर्क आणि सावध राहणेच महत्वपूर्ण आहे.

राज्यात कोविडचे प्रमाण कमी झाले असले तरी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला आहे. संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी चाचणीची संख्या कमी नसावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले की, स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे. आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी कामगारांसाठी लसीचे दोन्ही डोस अनिवार्य केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here