@maharashtracity
पूल बांधकामावर १,७७५ कोटी रुपये खर्च
मुंबईतील वाहतूक कोंडीवर जालीम तोडगा
मुंबई
मुंबईतील वाहतूक कोंडी (traffic congestion) सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) १२ हजार कोटींच्या ‘कोस्टल रोड’ चे (Coastal Road) काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. आता ही वाहतूककोंडी आणखीन चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी सन २०२५ पर्यंत केबल आधारित (cable-stayed) १२ पुलांची उभारणी करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील माहिती, यशवंत जाधव यांनी दिली आहे. मुंबईच्या लोकसंख्येत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. तसेच, फेरीवाले, अतिक्रमण आदी कारणांमुळे रस्ते अरुंद होऊ लागले आहेत. तसेच, वाढत्या वाहन संख्येमुळे तर वाहतूक कोंडीची समस्या भयंकर वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो, इंधनाची नासाडी होत असून आर्थिक नुकसानही होत आहे.
त्यामुळे मुंबई महापालिकेने या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून कोस्टल रोडचे काम सुरू केले आहे. मात्र या कोस्टल रोडमुळे केवळ पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीवर काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने १,७७५ कोटी रुपये खर्चून केबल आधारित १२ पुलांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला.
या पुलांची उभारणी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MRIDC) आणि रेल्वे प्रशासन हे करणार आहेत, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
पालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ च्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातच या पुलांचे कामही २०२२ पासून टप्याटप्याने सुरु करण्याचा आणि या सर्व कामाची पूर्तता २०२५ पर्यंत करण्याचा प्रशासनाचा मानस आहे, अशी माहितीही यशवंत जाधव यांनी दिली.
पुलांची नावे व त्यावरील खर्च
रे रोड ब्रीज – १७५ कोटी रुपये
टिळक ब्रीज दादर – ३७५ कोटी रुपये
भायखळा ब्रीज – २०० कोटी रुपये
घाटकोपर ब्रीज – २०० कोटी रुपये
बेलासीस मुंबई सेंट्रल – १५० कोटी रुपये
आर्थर रोड ब्रीज – २५० कोटी रुपये
सेंट मेरी माझगाव – ७५ कोटी रुपये
करी रोड ब्रीज – ५० कोटी रुपये
मांटुगा ब्रीज – ५० कोटी रुपये
एस ब्रीज भायखळा – ५० कोटी रुपये
लोअर परळ ब्रीज – १०० कोटी रुपये
महालक्ष्मी ब्रीज – १०० कोटी रुपये