@maharashtracity

मुंबई: झेन मल्टिस्पेशालिटी हाँस्पिटलचे (Zen Multispeciality Hospital) डॉ तन्वीर अब्दुल मजीद, आँन्को सर्जन आणि डॉ संतोष पालकर, सल्लागार यूरोलॉजिस्ट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३० बाय १५ सेमी आकाराची ४.७५ किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढून रूग्णाला नवजीनव दिले आहे.

या व्यक्तिच्या शरिरातून ही गाठ काढण्यास यापूर्वी चार वेळा प्रयत्न करण्यात आले होते. अखेर पाचव्या वेळी डॉक्टरांना यश आले. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) या रुग्णांने डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानले.

छत्तीसगड येथील ४६ वर्षाचे शेतमजूर पोट फुगणे आणि श्वासोच्छ्वासाच्या समस्यांमुळे हैराण झाले होते. पुढे चालणे, बसणे आणि शेतीकाम करणे अशक्य झाले होते. यापूर्वी पोटातील गाठ काढण्यासाठी स्थानिक रूग्णालयांत ४ वेळा शस्त्रक्रियेचा झाला होता. मात्र त्या अयशस्वी ठरल्या.

कोविड-१९ (Covid -19) आणि संबंधित लॉकडाऊनखुले होऊ लागल्यावर चेंबूर (Chembur) येथील झेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावर सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट (Surgical oncologist) डॉ तन्वीर अब्दुल मजीद म्हणाले कि, ट्रेनमध्ये ३६ तासांच्या प्रवासानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सीटी स्कॅनद्वारे पाहिले असता डाव्या बाजूला एक खूप मोठी गाठ दिसून आली. ही गाठ डाव्या मूत्रपिंडाच्या संपूर्ण ओटीपोटात जाऊन उजवी मूत्रवाहिनी आणि उजव्या बाह्य वाहिन्यांना संकुचित करत होती. ट्यूमर डाव्या किडनीच्या (Kidney) अगदी जवळ असल्याने दोन्ही मूत्रपिंडांचे कार्य पाहण्यासाठी डीटीपीए स्कॅन (DTPA scan) करण्यात आले असल्याचे डॉ. तन्वीर म्हणाले.

तर युरोलॉजिस्ट डॉ. संतोष पालकर यांनी शस्त्रक्रियेपूर्वीची तयारी करून घेतली. जनरल अनेस्थेसिया अंतर्गत त्याच्या दोन्ही मूत्रवाहिनींना शस्त्रक्रियेदरम्यान ओळखण्यासाठी स्टेंट करण्यात आले होते, जेणेकरून अपघाती नुकसान टाळणे शक्य होईल.

हे ऑपरेशन क्लिष्ट असून ७ तास चालले. कमी रक्तदाब राखण्यासाठी आणि त्याच वेळी अखेर यशस्वी प्रयत्नांनी ३० बाय १५ बाय १५ सेमी आणि ४.७५ किलो वजनाची गाठ काढण्यात यश आले. त्यानंतर सुमारे २० दिवस रुग्णाला रुग्णालयात ठेवण्यात आले आणि त्यांनतर घरी सोडण्यात आले.

त्याला ३ महिन्यांपर्यंत जड वजन न उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्याच्या पोटातील जखम बरी होण्यासाठी पोटाच्या बाइंडरचा वापर करण्याचा सल्ला दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here