@maharashtracity

उद्यानाच्या डागडुजीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू

मुंबई: वडाळा (wadala) , अँटॉप हिल (antop hill) येथे एका उद्यानाच्या ठिकाणी डागडुजीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. यशकुमार चंद्रवंशी (११) (yashkumar chandravanshi) आणि शिवम जैस्वाल (९) ( shivam jaiswal) अशी मृत मुलांची नावे आहेत. The unfortunate death of falling into a pit dug for garden repairs

प्राप्त माहितीनुसार, वडाळा, अँटॉप हिल,
सीजीएस काॅलनी (CGS colony), सेक्टर ७ जवळील एका उद्यानात सेंट्रल पीडब्ल्यूडी (PWD) मार्फत पाण्याच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आलेला होता. सदर खोल खड्ड्यात पाणी साचलेले होते. आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शिवम आणि यशकुमार ही दोन्ही मुले खेळत असताना त्या खड्ड्यात अचानक पडली व खड्ड्यातील पाण्यात बुडाली.

मात्र या उद्यानाच्या ठिकाणी (garden area) खेळणाऱ्या काही मुलांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे आरडाओरड झाली व या दोन्ही मुलांच्या मदतीला इतर काहीजण धावले. या मुलांना काही अवधीतच खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्या दोन्ही मुलांना तातडीने नजीकच्या सायन रुग्णालयात (sion hospital) उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

सदर घटनेची नोंद वडाळा पोलीस ठाण्यात (wadala police station) करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस (mumbai police) अधिक तपास करीत आहेत.

मुंबईत यापूर्वीसुद्धा खड्ड्यात (pit dug) , नाल्यात पडून लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या असून अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात पालिका प्रशासन (BMC) व पोलीस यंत्रणा (Police system) यांना अपयश येत असल्याची टीका नागरीकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here