@maharashtracity

सर्वसामान्य ते अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सर्वांना एकच नियम

मुंबई: वैद्यकीय सेवा (medical services), दूरसंचार क्षेत्र (telephone sector), गॅस पुरवठा, जल पुरवठा (water supply) या सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्या लसवंतानाच लोकल प्रवास सुरु राहिल अशी सुचना मंगळवारी करण्यात आली. (Two jab of covid vaccination mandatory for local journey)

सर्वसामान्य ते अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (employees of emergency services) असे सर्वांना एकच लोकल प्रवास नियम लागू करण्यात आला आहे. यांना मासिक पास पद्धतीने तिमाही किंवा सहामाही प्रवास पास देखील आता मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून विशेष परिपत्रकातून प्रसारीत करण्यात आली.

आता पर्यंत लसीकरण कार्यक्रमाला सुरु होऊन दहा महिने उलटून गेले. आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याने लस घेतली किंवा नाही हे न बघता रेल्वेचा पास देण्यात येत होता. आता मात्र तसे राहणार नसून लसवंतांनाच रेल्वे प्रवास राहणार आहे.

दिनांक १५ ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्यांनाही लोकल प्रवास खुला करण्यात आला. आता लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून लसीकरणाचा वेगही चांगला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लसीकरणाचा नियम लागू करत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

यापुढे प्रवासासाठी सार्वत्रिक पास (universal Pass) कोरोनाचे दोन्ही डोस झालेल्या आणि त्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेल्यांना दिला जाईल. युनिव्हर्सल पास देण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असो किंवा नसो, पण संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सरकारकडून प्रसारित करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये लोकल दैनंदिन तिकिटाबाबत कोणताही उल्लेख नसल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र वर मिळणारे लोकलचे तिकिट देखील बंद होण्याची शक्यता आहे.

त्याऐवजी प्रवाशांना मासिक पास, त्रैमासिक पास, सहामाही पास दिले जाणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here