@maharashtracity
धुळे: धुळे (Dhule) तालुक्यातील आर्वी शिवारातून भरधाव मोटार दुसर्या मोटरीला धडकल्यामुळे तलाठीसह दोघे जागीच ठार झाले. तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे.
आर्वी येथील तलाठी हिरालाल नानाभाऊ रोकडे-माळी, सुनिल प्रल्हाद मोहन, चालक धनराज उर्फ दीपक विठ्ठल मराठे हे मोटारीने (एमएच- 18, एजे 2062) धुळे शहराकडून आर्वीकडे जात होते. तर मालेगावकडून दुसरी मोटर (एमएच-16, आर- 5992) धुळे शहराकडे जात होती.
रोकडे हनुमान मंदिराजवळून जाताना समोरील मोटार अचानक दुभाजक ओलांडून तलाठी रोकडे यांच्या मोटारीवर जाऊन धडकली. या अपघातात चालकासह तिघे जखमी झाले. त्यांना हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तलाठी रोकडे, दीपक यांचा मृत्यू झाला तर सुनील जखमी झाला.