@maharashtracity

मुंबई: दिव्यांग (Divyang) व्यक्‍तींना वैश्विक ओळखपत्र (Universal Divyang Identity Card – IDI Card) देण्यात येत असते. मात्र कोरोना (corona) आणि लॉकडाउनमुळे त्‍याला थोडा उशीर झाला. मात्र आता जे. जे. रूग्‍णालयात (JJ Hospital) या कार्डांच्या वाटपाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्‍यामुळे दिव्यांग व्यक्‍तींना हे कार्ड मिळणे सुकर होणार आहे.

दिव्यांग व्यक्‍तींना युडीआयडी कार्ड देण्यात येत असते. त्‍याचा त्‍यांना विविध कामांसाठी उपयोग होत असतो. जे.जे. रुग्णालयाच्या शासकीय भवन इमारत, लेडीज हॉस्‍टेलच्या बाजूला, चौथा मजला येथे दिनांक ३ ते ७ जानेवारी दरम्‍यान हे कार्ड वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी १० ते ४ या कालावधीत हे कार्ड वाटप होणार असून ८ हजार कार्डांचे वाटप होणार असल्‍याची माहिती जे जे रूग्‍णालयाचे हेड क्‍लार्क अनिल दळवी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here