@maharashtracity

बदलापूर : शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी आज कुळगाव – बदलापूरच्या विकासासाठी 56 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (UD Minister Eknath Shinde) यांची मंजुरी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे (Shiv Sena MP Dr Shrikant Shinde) यांच्या पुढाकाराने हा निधी मंजूर झाला आहे.

वामन म्हात्रे यांची आज खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी म्हात्रे यांनी बदलापूर विकासाचा आराखडा सादर केला.

या बैठकीत एकूण 56 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामासाठी निधी मंजूर करण्यातआला. (Badlapur to get Rs 56 crore after efforts of Vaman Mhatre).

त्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी (Balasaheb Thackeray memorial) रुपये ३ कोटी ५० लाख, बदलापूर शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी रुपये २५ कोटी, वडवली येथील शिवमंदिरासाठी रुपये ३ कोटी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणअंतर्गत विविध कामासाठी रुपये 25 कोटी मंजूर करण्यात आले.

तसेच बदलापूर शहरातील उल्हास नदीवर नव्याने असलेल्या पूरनियंत्रण रेषेची (flood line) पुर्नसर्वेक्षण करून बदलापूरकरांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.

“यातील मोठा निधी नगर विकास विभागाकडून मिळेल तर उर्वरित निधी एम एम आर डी ए (MMRDA) च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे,” अशी माहिती वामन म्हात्रे यांनी दिली.

या बैठकीला पालिकेचे मुख्याधिकारी गोडसे, मंत्री शिंदे यांचे खाजगी सचिव खतगावकर, तोडणकर, शाखा प्रमुख भरात नवगिरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here