@maharashtracity

महाड (रायगड): महाड (Mahad) तालुक्यातील केंबुर्ली गावात पिण्याच्या पाण्यासाठी आक्रोश व्यक्त करत ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य विरोधात टाहो फोडला गेल्या. अनेक दिवसापासून या ठिकाणी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

महाड शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या केंबुर्ली गावात अनेक वर्षापासून पाणीटंचाई (water scarcity) भेडसावत आहे. गावातील महिलांना जीव धोक्यात घालत महामार्ग ओलांडून पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्व्हमधून बाहेर पडणारे पाणी नेण्यासाठी जावे लागते. सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या परिसरातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन (pipeline) जागोजागी उघडल्या गेल्या आहेत. त्यामुळे गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.

ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याने, गावामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने वयोवृद्ध महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील मोहल्ल्यातील महिलांनी आज एकत्रित येत महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. शिवाय महिलांनी गावामध्ये होत असलेल्या पाणीटंचाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सरपंच पाणी समस्येवर तोडगा काढत नसल्याने सरपंचावर देखील आक्रोश व्यक्त केला. मोहोप्रे येथून जॅकवेलद्वारे पाणी उपसा करून या परिसरातील गावांना पाणी पुरवठा केला जातो. महामार्ग चौपदरीकरणात ही पाईपलाईन जागोजागी तुटली आहे. ही पाईपलाईन जोडून देण्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीची (L & T) असून पाईपलाईन जोडून देण्यात येईल, असे कंपनी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

“पाईप लाईन पूर्ण जोडून झाल्यानंतर देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नसेल तर त्यास पाणी पुरवठा विभाग जबाबदार असणार आहे.

गावामध्ये अनेक समस्यांपैकी पाणीपुरवठा एक मोठी समस्या असून गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत आहे यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे .”

  • अखलाक घोले, स्थानिक ग्रामस्थ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here