बुधवारी मात्र २६ जुलैची प्रचीती

X : @maharashtracity

मुंबई: मुसळधार पावसाने बुधवारी रात्री मुंबईकरांना वेठीस धरले होते. पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत ऑरेंग अलर्ट घोषित केला. त्या पाठोपाठ सरकारने देखील मुंबई परिसरातील शाळा कॉलेजांना सुटी जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र गुरुवारी मुंबईत ढगाळ वातावरण होते. म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गुरुवारी पाऊस झाला नसल्याचे चित्र होते.

दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा पर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासाच्या कालावधीत मुंबई शहरात ११७.१८, पूर्व उपनगरात १७०.५८ तर पश्चिम उपनगरात १०८.७५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. तसेच चोविस तासाच्या कालावधीत कुलाबा पंपींग २०४, एन एम जोशी मार्ग मनपा शाळा १६८, शिवडी कोळीवाडा १६५, प्रतिक्षा नगर मनपा शाळा १६४, तसेच महापालिका मुख्यालय १६४ मिमी एवढा पाऊस झाला. 

तर पूर्व उपनगरातील मानखुर्द फायर स्टेशन २८०, नुतन विद्या मंदिर २७९, एन वॉर्ड ऑफीस २६०, टेंभीपाडा मनपा शाळा भांडूप २५०, तर टागोरनगर विक्रोळी  मनपा शाळा २४५ मिमी एवढा पाऊस झाला. तसेच पश्चिम उपनगरात आरे कॉलनी मनपा शाळा १९७, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा शाळा १९२, मरोळ फायर स्टेशन १६९, मालपा डोंगरी मनपा शाळा १६९, के पूर्व वॉर्ड अॅाफीस १४८ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली.

चाळीतील भिंतीचा भाग पडून ४ जखमी

भांडूप पश्चिम येथील तुळशीपाडा गायत्री विद्यामंदिर जवळील चाळीतील घराच्या भिंतीचा काही भाग पडून ४ जण फसले हेते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. मात्र तिघांवर खासगी सिद्धी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. यात क्रांती पाठोळे (२६), शिला पाठोळे (४५) तसेच सुरेंद्र पाठोळे (५६) यांच्यावर उपचार सुरु होते. तर भांडूप पश्चिमेकडील हनुमान नगर, खदान शिंदे मैदान येथे काही डोंगराचा भाग कोसळून माधुरी शर्मा (४३) जखमी झाली होती. तिला अग्रवाल पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार करून सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here