@maharashtracity

संसर्ग कमी होताच शस्त्रक्रिया वाढल्या

मुंबई: सार्वजनिक रुग्णालयांमध्ये मोतीबिंदू पासून गुडघ्यांच्या शस्त्रक्रियांपर्यंतच्या इच्छूक रुग्णांचे प्रमाण वाढले असून सार्वजनिक रुग्णालयातील शल्यचिकित्सक आता व्यस्त झाले आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना (corona under control) इतर छोट्या मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्ण रुग्णालयांकडे धाव घेऊ लागले असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

दरम्यान, शस्त्रक्रियांचे वेळापत्रक व्यस्त झाले असल्याचे सांगताना सायन रुग्णालयाचे (Sion Hospital) अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी (Dean Dr Mohan Joshi) यांनी सांगितले की, दररोज १०० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यात लहान-मोठ्या शस्त्रक्रियांचा समावेश असून आता ही संख्या हळूहळू वाढत असल्याची माहिती सायन रुग्णालयातून देण्यात आली.

तर सर्वात छोटी आणि कमी वेळेत होणारी शस्त्रक्रिया म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होय. यावर बोलताना जेजे रुग्णालयातील नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख (Dr Ragini Parekh) यांनी सांगितले की, आता कोरोना नियंत्रणात येत असल्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यास सतत विचारणा होत आहे. गेल्या आठवड्यात डॉक्टरांच्या टीमने दररोज सरासरी ७० शस्त्रक्रिया केल्या आहेत.

शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी वाढत असून गर्दी देखील वाढत आहे. त्यांच्या टीमला आता दिवसाला १५० शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार राहावे लागणार असल्याचे डॉ रागिणी पारेख यांनी सांगितले. मात्र या विरुद्ध कोविडकाळात शस्त्रक्रियेचा आलेख एका दिवसात २० ते ३० टक्क्यांपर्यंत घसरला होता असल्याचे डॉ. पारेख म्हणाल्या.

परभणीतील ८०० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ७० संख्येच्या बॅचमध्ये तारखा देण्यात आल्या आहेत, असेही डॉ.पारेख यांनी सांगितले. तर व्यस्त असणारे हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा (Dr Ramakant Panda) यांना आता महामारीच्या काळात पूर्वीपेक्षा दररोज अधिक शस्त्रक्रिया कराव्या लागत असल्याचे सांगण्यात आले.

कोविड काळात शस्त्रक्रिया वेळापत्रक पुढे ढकलणाऱ्या रुग्णांनी गेल्या अठरा महिन्यानंतर आता शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे माहिती देण्यात आली. तसेच सायन रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुधीर शरण यांनी गुडघे आणि नितंब बदलण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी रिघ लागली असल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here