Twitter: @maharashtracity

मुंबई: गेल्या दोन दिवसापासून मुंबई आणि परिसरातील हवेचा दर्जा निर्देशांक (AQI : AIR QUALITY INDEX) अगदी खालावला असून यात चेंबूर आणि नवी मुंबईतील हवेचा दर्जा अतिशय वाईट श्रेणीतील असल्याचे “सफर ” या हवेच्या गुणवत्तेची माहिती देणाऱ्या संस्थेच्या नोंदीतून स्पष्ट होत आहे. या प्रदुषणामुळे संवेदनशील व्यक्तींना आरोग्याबाबत इशारा देण्यात आला आहे. तर प्रदूषण टाळण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

रविवारीदेखील मुंबईतील हवेचा दर्जा निकृष्ट दर्जाचा होता. सोमवारीदेखील त्याच समकक्षेतून हवेच्या दर्जाची नोंद करण्यात आली. नवी मुंबई येथील हवा दर्जा निर्देशांक ३२२ एवढा नोंदविण्यात आला असून “सफर” कडून या ठिकाणी अतिशय वाईट असा शेरा देण्यात आला आहे. त्याचवेळी चेंबूर येथील हवेचा दर्जा निर्देशांक ३०३ असे नोंदवून येथेही अतिशय वाईट असा शेरा देण्यात आला आहे. तर 

“सफर” कडून वाईट स्थितीचा शेरा देण्यात आलेली पाच ठिकाणांत माझगाव, मालाड, कुलाबा, मुंबई शहर आणि बीकेसी या परिसराचा समावेश आहे. चार ठिकाणांना मध्यम शेरा देण्यात आला आहे. यात अंधेरी, बोरिवली, भांडूप आणि वरळी हे परिसर मोडत आहेत. हवेतील प्रदुषण वाढल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. यात फुफ्फुसाचे विकार असलेल्या व्यक्तींना खराब वायु गुणवत्ता निर्देशांकांमुळे गुंतागुंत होण्याचा धोका अधिक होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

सफर नोंद : 

उपनगर         एक्यूआय        शेरा 
नवी मुंबई       ३२२             अतिशय वाईट
चेंबूर             ३०३              अतिशय वाईट
माझगाव        २७३              वाईट
मालाड          २२८               वाईट
कुलाबा          २१५               वाईट
मुंबई (शहर)    २०८              वाईट
बीकेसी         २०८                वाईट
अंधेरी          १७३                 मध्यम
बोरीवली        ११४                मध्यम
भांडुप          १०८                  मध्यम
वरळी          १०४                   मध्यम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here