maharashtracity

मुंबई: पालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने ( Municipal Encroachment Elimination Squad ) पदपथावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराचा माल जप्त करण्याची कारवाई केल्याने दुकानदार मालकाने पालिका अधिकाऱ्यांशी नाहक हुज्जत घालत अरेरावीपणा केल्याचे निदर्शनास आले आहे.

मात्र पालिका अधिकाऱ्यांनीही अरेला कारेने उत्तर देण्याचा पवित्रा घेतल्यानंतर सदर व्यापारी काहीसा नरमला.

घाटकोपर (प.) , रेल्वे स्थानक परिसरातील हिराचंद देसाई मार्गावरील ( Hirachand desai road) मेट्रो रेल्वे स्टेशनच्या ( Metro railway station) खालील भागात कपडे विक्रेत्यांची दुकाने आहेत. मात्र दुकानात पुरेशी जागा असतानाही सदर दुकानदार दुकानासमोरील पदपथाच्या जागेवर अतिक्रमण करून तेथेही कपडे विक्रीचा व्यवसाय करीत असे.

गुरुवारी पालिका ‘एन’ वार्ड अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी वाहनासह सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी व खातरजमा करून मगच सदर दुकानदाराचा कापड्यांचा काही प्रमाणातील साठा ताब्यात घेऊन व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला.

त्यामुळे संतप्त झालेल्या दुकानदाराने पालिकेच्या कारवाईला विरोध दर्शवत संबंधित अधिकाऱ्याशी हुज्जत घातली.

यावेळी, पालिकेच्या अन्य एका अधिकाऱ्याने सदर दुकानदाराला कोरोनाच्या नियमानुसार ( corona pandemic rules) तोंडाला मास्क ( Face shield) लावण्यास सांगितले असता सदर दुकानदाराने, ‘ मी मास्क लावणार नाही, काय करायचे ते करा’, असे उद्धटपणे उत्तर दिले.

त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला झापले त्यानंतर त्या दुकानदाराने लगेचच तोंडाला मास्क लावला पण तोंडाची पट्टी मात्र चालू ठेवत हुज्जत घातली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तुला पालिकेच्या कडक कारवाईला सामोरे जायचे आहे का, असा सज्जड दम भरला असता तो दुकानदार काहीसा नरमला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here