@maharashtracity

शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना निःशुल्क प्रशिक्षण

मुंबई: मुंबईत कोविड-१९ च्या (covid-19) प्रादुर्भावामुळे सतत कामाचा ताण आल्याने त्याचा आरोग्यावर व कामावर होणारा परिणाम पाहता मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना ‘विपश्यना’चे (Vipassana) धडे देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

पालिका शिक्षण विभागाच्या (Education department) ३०० कर्मचाऱ्यांना मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राखून नागरी सेवा-सुविधा देण्याच्या कामात आणि प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्याच्या उद्देशाने पालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांच्या आदेशाने शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी करीरोड येथील शिक्षण विभागाच्या मुख्यालयात ‘आनापानसती’ प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच केले होते.

‘कोविड – १९’ या साथरोगाच्या (epidemic disease) प्रादुर्भावादरम्यान पालिका कर्मचारी यांनी विविध शारीरिक व मानसिक आव्हानांना सामोरे जात अधिकाधिक प्रभावी सातत्यपूर्ण सेवा देत आपले मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, अद्यापही कोविडचे सावट काही प्रमाणात आहे.

पालिकेचे सेवानिवृत्त सह-आयुक्त शांताराम शिंदे यांनी या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करताना ‘आनापानसती’ क्रियेचे आपल्या जीवनातील महत्व स्पष्ट केले. ‘आनापानसती’ (anapanasati meditation) हा विपश्यनेचा एक भाग असून, याद्वारे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आपले मन स्थिर केले जाते.

या क्रियेद्वारे मानसिक व शारीरिक आरोग्य (physical and mental health) सुदृढ राखण्यास मदत होत असल्याबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी धम्म प्रसारक एस. एन. गोयंका गुरुजी यांच्या ध्वनिफितीच्या सहाय्याने हे प्रशिक्षण देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here