By Sachin Unhalekar

Twitter :@Saachin2Rav

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे स्वतः व्यंगचित्रकार असल्याने त्यांच्याच नावाने “माझी मुंबई” या संकल्पनेवर आधारीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव 9 फेब्रुवारी रोजी नियोजित होता. पण महिना उलटूनही अद्याप बालचित्रकला मध्ये बाजी मारलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची तारीख महापालिकेच्या शिक्षण खात्याला सापडलेली नाही. यात बिचारी मुले स्वतः चा गौरव कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहे.

पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी बालचित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदा “माझी मुंबई” या संकल्पनेवर आधारीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा मुंबईतील 45 ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत 77 हजार 453 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव 9 फेब्रुवारी रोजी महापालिका बक्षीस देऊन करणार होती. विजेत्या स्पर्धकांना 500 ते 25 हजार रुपयांपर्यंतची 552 पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त केशव उबाळे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली होती. यावेळी शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे, प्राचार्य दिनकर पवार आणि पालिकेचे उपजनसंपर्क अधिकारी गणेश पुराणिक उपस्थित होते.

दरम्यान, यासंदर्भात उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 9 फेब्रुवारी ही तारीख उलटून गेली आहे, हे खरं आहे. आम्ही ही दुसऱ्या कामात सध्या व्यस्त आहे. दामोदर नाट्यगृहात गौरव सोहळा आयोजित केला जाणार होता. पण तारीख मिळाली नाही. याबाबत अधिक माहिती प्राचार्य दिनकर पवार यांच्याशी संपर्क साधून कळवितो. मात्र आम्ही लवकरच विजेत्यांचा गौरव करू, असे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here