@maharashtracity

११०० डॉक्टरांची केली तपासणी

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील केईएम रुग्णालयात २९ डॉक्टर लक्षण विरहित (asymptomatic) कोरोना पॉजिटीव्ह
आढळले असल्याची माहिती केईएम अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. (29 doctors found asymptomatic corona positive in KEM)

दरम्यान कोरोना लस देताना आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले होते. आता दुसरी लाट ओसरताना दिसून येत आहे. अशावेळी दोन्ही लसीचे डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची तपासणी सुरु आहे.

मात्र, अशा तपासणीत एखादा पॉजिटीव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जाते. त्याप्रमाणे केईएम रुग्णालयातील डॉक्टरांची तपासणी करण्यात आली.

Also Read: बेमुदत काम बंद आंदोलनावर निवासी डॉक्टर ठाम

यावर बोलताना अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, एका बॅचमध्ये २५० डॉक्टर असे दोन बॅच म्हणजे ५०० डॉक्टर असतात. शिवाय पहिल्या व दुसऱ्या वर्षातील एमबीबीएस वर्गातील प्रत्येकी १८० अधिक ८५० आणि इंटर्न बॅच मिळून ११०० डॉक्टर तपासले. ११०० डॉक्टरांमागे २९ डॉक्टर ए सिम्प्टोमॅटिक आढळले. याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन (break through infection) म्हटले जाते.

यात ६ एमबीबीएसच्या पहिल्या वर्गातील तर २३ जण दुसऱ्या वर्गातील वेगवेगळ्या हॉस्टेल तसेच घरी राहणारे असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले. या सर्वांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. निवासी डॉक्टर, एमबीबीएस, इतर कर्मचारी मिळून केईएम रुग्णालयात ५ हजार आरोग्य कर्मचारी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here