घशावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
Twitter :@maharashtracity
मुंबई: पश्चिम उपनगरात राहणारे संजीव झा ( वय ५०) वयाच्या तीन वर्षांपासून गात असून बॉलीवूडमधील दिग्गज गायकांसोबत त्यांनी गाणी गायली आहेत. दिवाळीनंतर अचानक त्यांच्या आवाजांमध्ये कर्कशपणा जाणवू लागला होता. गाताना त्यांचा घसा दुखू लागला होता. आपल्या या त्रासाबद्दल अनेक ठिकाणी उपचार केले परंतु त्याला यश आले नाही. अलीकडेच एका डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बोरिवलीतील अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु केले. यावर शस्त्रक्रिया करुन त्यांचा आवाज पुन्हा मिळवून देण्यास मदत झाली.
संजीव झा वर उपचार करणाऱ्या ईएनटी आणि व्हॉईस सर्जन डॉ. बिन्ही देसाई यांनी सांगितले की, झा यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या केल्या. त्यांची आणि स्ट्रोबोकॉपी केली असता त्यांच्या व्हॉईस बॉक्समध्ये डाव्या बाजूच्या व्होकल फोल्ड पॉलीप भरल्याचे दिसून आले. आवाज तसेच अन्न गिळण्याची आणि श्वसनाची समस्या असलेल्या रुग्णांसाठी स्ट्रोबोस्कोपी ही सुवर्ण मानक वैद्यकीय चाचणी आहे. त्यांच्यावर व्होकल बॉक्सवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. हेल्थकेअर मानकांनुसार या प्रकारची शस्त्रक्रिया अत्यंत गंभीर असल्याने अत्याधुनिक शल्यचिकीत्सा विभाग व वैद्यकीय कौशल्य आवश्यक आहे. रुग्णालय टीमच्या मदतीने आम्ही व्हॉईस बॉक्समध्ये असलेली (गाठ ) मास यशस्वीरित्या काढून टाकले आणि हिस्टोपॅथॉलॉजीसाठी म्हणजेच कर्करोग तपासणीसाठी पुढे पाठवले. हा अहवाल सौम्य रक्तस्त्रावी पॉलीप म्हणून आला. रुग्णाने त्याचा आवाज पूर्णपणे परत मिळवला आणि एका महिन्याच्या कालावधीत त्याचे गायन पुन्हा सुरू केले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याणी गायनाचे दोन कार्यक्रम केले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.