@maharashtra.city
मुंबई: लालबागचा राजा नवसाला पावतो अशी जगभरात ख्याती आहे. त्यामुळे या बाप्पाच्या दानपेटीत भक्तगण मुक्त हस्ताने दान करत असतात. यावर्षी लालबागच्या राजाच्या दानपेटीत दहा दिवसात पाच कोटींचे दान जमा झाले. यात लालबागच्या राज्याचीच सोन्याची मुर्ति… सोन्याचे चॉकलेट… दागिने… मोदक… यासह चक्क हिरो होंडाची बाईक दान केली असल्याचे सांगण्यात आले. राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या – चांदीच्या वस्तूंचा लिलाव आता सुरु झाला असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, यंदा लालबागच्या राजाच्या दानपेटीत १४ किलो ४३३ ग्रॅम चांदी तर ३ किलो ६७३ ग्रॅम सोन्याच्या वस्तू दान करण्यात आल्या. या सर्व वस्तू लिलावासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. मोदक, हार, फूल, मूर्ती, गदा, चैन अशा सोन्या चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. यात प्रामुख्याने एक किलोपेक्षा जास्त वजनाची लालबागचा राजाची हिरेजडित मूर्ती दान करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. या मूर्तीची किंमत एक लाखापेक्षा जास्त आहे. तर एक किलो वजनाचं सोन्याचं चॉकलेट आणि एका सोन्याच्या बिस्किटाचाही लिलाव केला जाणार आहे.