ऑल फूड अँड ड्रग्ज लायसंस होल्डर फाऊंडेशन असोसिएशनकडून पालिकेकडे चौकशीची मागणी

Twitter : @maharashtracity

मुंबई: ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसंस होल्डर फाऊंडेशन असोसिएशनकडून मुंबई महानगर पालिकेच्या अख्त्यारीतील रुग्णालयांसबंधित विविध समस्या सतत विचारल्या जाणार असून त्याची सुरुवात शस्त्रक्रियेला लागणाऱ्या धाग्याच्या खरेदी निविदा प्रक्रियेपासून करण्यात आली असल्याची माहिती ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसंस होल्डर फाऊंडेशन असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली. रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी लागणारा हा धागा अत्यंत महत्वाचा असून सध्या रुग्णाला हा धागा ५०० टक्के वाढीव दराने औषधांच्या दुकानांतून खरेदी करावा लागत आहे. शेड्युल ९ अशा अत्यंत महत्वाच्या वर्गात मोडणाऱ्या या धागा खरेदीची निविदा खुली करुन १४ महिने उलटून देखील अद्याप निर्णय घेतला जात नाही. ही निविदा खरेदी मर्जीतील कंपन्यांना देणार का असा आरोप ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसंस होल्डर फाऊंडेशन असोसिएशनकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर लागणाऱ्या धाग्याच्या खरेदीसाठी डिसेंबर २०२२ कालावधीत निविदा खुले करण्यात आली. मात्र, अद्याप त्याची खरेदी होत नसल्याने रुग्णांना नाहक आर्थिंक भूर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रार असोसिएशनकडे येत आहेत. या धाग्याची रुग्णालयांच्या शस्त्रक्रिया विभागात परवड होऊ नये ही वैद्यकीय गरज आहे. मात्र पालिका रुग्णालयांत याच्या खरेदी निविदा प्रक्रिया डावलली जात असल्याची तक्रार करत निविदा अंतिम न करण्याच्या कारणांची चौकशीची मागणी करण्यात येत आहे. पालिकेने या शेड्यूल ९ वैद्यकीय वस्तूची खरेदी निविदा २०२२ फेब्रुवारीमध्ये काढल्या. या निविदेत अनेक कंपन्या सहभागी झाल्या. डिसेंबर २०२२ मध्ये प्रक्रियेची व्यावसायिक बोली उघडण्यात आली. मात्र चौदा महिने उलटूनही आजपर्यंत निविदा निघालेली नाही. या ठिकाणी काही मर्जीतील कंपन्यांना हे टेंडर राखून ठेवण्यात येत आहे का असा ही सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळै निविदा अंतिम न करण्याच्या कारणांची चौकशी करण्याची मागणी ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसंस होल्डर फाऊंडेशन असोसिएशनच्या अभय पांडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here