By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई : अखेर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी १६ मार्च २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता परळ येथील दामोदर नाट्यगृहात पार पडणार आहे.

दरम्यान, स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव 9 फेब्रुवारी रोजी नियोजित होता. पण महिना उलटूनही अद्याप बालचित्रकलामध्ये बाजी मारलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची तारीख महापालिकेच्या शिक्षण खात्याला सापडलेली नाही. यात बिचारी मुले स्वतः चा गौरव कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहे, अशी बातमी maharashtracity.city ने “बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचा गौरव कधी होणार?” या मथळ्याखाली प्रकाशित केली होती.

या बातमीचा संदर्भ देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ का होत नाही, असा जाब पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) माजी आमदार अरविंद नेरकर यांनी विचारला. महापालिकेचे स्वतः चे प्रबोधनकार ठाकरे आणि दीनानाथ नाट्यगृह असून येथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम करण्यासाठी तारखा मिळत नाही, हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे उत्तरच हास्यास्पद आहे. उलट बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ होऊ नये म्हणून कोणी राजकीय षड्यंत्र रचत आहे का, असा सवाल ही नेरकर यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना विचारला होता.

maharashtracity.city ने “बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचा गौरव कधी होणार ?” या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या बातमीने खळबळ माजली होती. नंतर अनेक वृत्तपत्रांनी दखल घेत या संदर्भातील बातम्या प्रकाशित केल्या.

आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ १६ मार्च २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता परळ येथील दामोदर नाट्यगृहात पार पडणार आहे.

“माझी मुंबई” या संकल्पनेवर आधारीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत एकूण ५२ अंतिम विजेत्यांना एकूण रू. ४,४०,०००/- रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी बालचित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदा “माझी मुंबई” या संकल्पनेवर आधारीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा मुंबईतील 45 ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत 77 हजार 453 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव 9 फेब्रुवारी रोजी महापालिका बक्षीस देऊन करणार होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here