दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जखमी
Twitter : @maharashtracity
मुंबई: घाटकोपर पूर्व राजावाडी काॅलनीतील बिल्डिंग खचल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रमाबाई आंबेडकर काॅलनीतील चाळ नंबर २१ तळ अधिक एक मजली बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
घाटकोपर पूर्व रमाबाई आंबेडकर काॅलनी, आंबेडकर पुतळ्याजवळ, चाळ नंबर २१ ही तळ अधिक एक मजली आहे. पहिल्या मजल्याचा भाग सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. महादेव खिल्लारे (५०), सुनिता खिल्लारे (४२), रोहित खिल्लारे ( २३) व वैभव खिल्लारे (२०) हे एकाच कुटुंबातील आई वडील व दोन मुले असे चौघे जखमी झाले. चौघांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ओपीडीत उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.