मनपा निवडणूकिसाठी ओबीसी प्रभाग वगळून आरक्षण जाहीर

अनुसूचित जातीसाठी १५ जागा तर
अनुसूचित जमातीसाठी २ जागा जाहीर

पुरुष व खुला वर्ग ११८ जागा जाहीर

अपेक्षित वार्ड मिळाल्याने अनेक माजी नगरसेवक, नेते इच्छुकांना दिलासा

आरक्षित प्रभागांचा फटका बसल्याने अनेक दिग्गजांना मोठा फटका

लॉटरी पद्धतीने एकूण ३२ प्रभागांची सोडत काढण्यात आली.

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सन २०२२ च्या निवडणुकीसाठी मंगळवारी वांद्रे, रंगशारदा येथे पालिका आयुक्त इकबाल चहल, निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत नवीन प्रभाग रचनेनुसार २३६ प्रभागातून महिलांसाठी ५० टक्के प्रभाग म्हणजे ११८ प्रभाग , अनुसूचित जातीसाठी १५ प्रभाग, अनुसूचित जमातीसाठी २ प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत.

आरक्षित प्रभाग जाहीर झाल्याने अनेक माजी नगरसेवकांना आपला प्रभाग सुरक्षित झाल्याने आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रभाग खुला झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर प्रभाग महिला, अनुसूचित जाती, अनुसुचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने अनेक माजी नागरसेवकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये, पालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, शिवसेनेचे अनिल कोकीळ, विश्वनाथ महाडेश्वर, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, अमेय घोले, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी , समाजवादी पक्षाचे गटनेते व माजी नगरसेवक रईस शेख ( मात्र रईस शेख हे सध्या आमदार आहेत.) आदी माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे आता ज्या ज्या माजी नगरसेवकांना या आरक्षित प्रभागांचा फटका बसला आहे, त्यांना आपल्या आजूबाजूच्या किंवा थोड्या दूरच्या पण सोयीच्या प्रभागात उडी मारून निवडणूक लढावी लागणार आहे.

आज २३६ प्रभागांपैकी ११८ महिला प्रभाग झाले आहेत. तर उर्वरित ११८ प्रभागात पुरुष उमेदवारांना निवडणूक वाढविता येणार आहे. पालिकेच्या इतिहासात मागील काही वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला व पुरुष उमेदवार यांना समसमान संधी उपलब्ध झाली आहे.

तसेच, महिलांसाठी आरक्षित झालेल्या ११८ प्रभागात अनुसूचित जाती महिलांसाठी – ८, अनुसूचित जमाती महिलांसाठी १ अशा ९ प्रभागांची सोडत लॉटरी पद्धतीने काढण्यात आली. तसेच, महिलांसाठी ११८ प्रभाग आरक्षित करताना उर्वरित १०९ प्रभागांपैकी ८६ प्रभाग चक्रआकार पद्धतीने अगोदरच आरक्षित करण्यात आल्या आहेत.

तर उर्वरित २३ महिला प्रभाग आरक्षित करण्यासाठी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात आली. लॉटरी पद्धतीने एकूण ३२ प्रभागांची सोडत काढण्यात आली.

२३६ प्रभागांचे आरक्षण खालीलप्रमाणे

अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक
६०,८५,१०७,११९,१३९,२५३,१५७,१६२,१६५,१९०,१९४,२०४,२०८,२१५ व २२१ हे १५ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती महिला प्रभाग आरक्षित करण्यासाठी लॉटरीद्वारे सोडत काढण्यात आली. त्यात, अनुसूचित महिलासाठी -: १३९,१९०,१९४,१६५,८५,१०७,११९,२०४ हे प्रभाग लॉटरी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आले आहेत.

अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ५५ – १२४ या प्रभागातून लॉटरी सोडतीद्वारे १२४ हा प्रभाग अनुसुचित जाती महिलासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

त्यानंतर, ११८ महिला प्रभागांपैकी सर्वसाधारण महिलांसाठी १०९ प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. निवडणूक विभागाने चक्राकार पद्धत या गुणसूत्राचा वापर करून ८६ प्रभाग अगोदरच राखीव होत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर उर्वरित २३ प्रभागांसाठी आरक्षण सोडत लॉटरी पद्धतीने काढण्यात आली. त्यानुसार, प्रभाग क्रमांक ११,४४,५०, ७५, ७९,१०२,१५४,१५५,१६०,८१,८८,९९,१३७, २१७,१४६,१८८,१४८,९६,९, १८५, १३०,२३२, ५३ हे प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here