@maharashtracity

नायरच्या उपअधिष्ठातांमार्फत होणार चौकशी

जखमींवरील उपचारात दिरंगाई झाल्याबाबतचा व्हिडिओ झाला व्हायरल

चौकशी व कारवाईचे आदेश

मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळीत मंगळवारी झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटातील ४ जण जखमींना उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता त्यावेळी दिरंगाई करण्यात आली, असा आरोप केला जात आहे.

यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची गंभीर दखल घेऊन नायर रूग्णालय अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी तात्काळ या घटनेची चौकशी करण्याचे आदेश उप अधिष्ठाता यांना दिले आहेत.

तसेच, या चौकशीत जर कोणी दोषी आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे सदर दुर्घटनेतील जखमींना उपचार देण्यात खरच काही दिरंगाई झाली की व्हायरल व्हिडिओ खोटा आहे, याचा उलगडा होण्यास मोठी मदत होणार आहे.

Also Read: मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध

या गॅस सिलिंडरच्या स्फोटात (gas cylinder blast) आनंद पुरी (२७) आणि मंगेश पुरी (४ महिने) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर विद्या पुरी (२५) आणि विष्णू पुरी (५) हे दोघेजण जखमी असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मात्र चौघांना नायर रुग्णालयात उपचारासाठी नेले असताना त्यावेळी रूग्णालय प्रशासनाकडून दिरंगाई झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून चर्चेला उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here